कळीने पाहिले कोठे फुलाचे हासणे, रुसणे …जिवाच्या नर्मधाग्यांचे तटातट तोडणे,तुटणे
तुला बोलावले येथे फुलांचा माळण्या गजरा… परंतु हाय वाट्याला नशिबी बोचणे, रुतणे
नशीबी जे असे माझ्या कुणाला ना कधी लाभो… सुखाच्या ऐन समयाला सुखाचे टोचणे , खुपणे
कधी ज्या घेतल्या शपथा तयांना अर्थ ना उरला… अता कोणास सांगावे व्यथांचे सोसणे , कुढणे
शशिकला.