गेले, पतंग जळुनी बदनाम प्रीत झाली
हसते बघून दुनिया ही काय रीत झाली ॥
देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले
एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥
आसूसल्या मनाला समजावया हवे ना
साऱ्याच जीवनाची स्वप्ने अतीत झाली ॥
धुंदावल्या दिशांना करितो कुणी इशारा
मृद्गंध घेऊनी ये काया सुशीत झाली ॥
शशीकला.