Original Gazal

प्रतीक्षा

Published on April 15, 2026

कसे हे जीव घेणारे,  जिवाला जीव देणारे |

घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥

दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।।

दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।।

 

प्रतीक्षा संपली माझी आता कोणी न येणारे |

कुठे गेले सखे पक्षी , घरी दररोज येणारे ॥

कुणाला दाद मागावी, इथे सारेच जळणारे|

मनाला लाख सांगितले, कुणी नाही मनवणारे॥

 

हसु ते आणती ओठी , मनी आसू लपवणारे॥

कुणाला ही कसे सांगु, उरीचे दुख सलणारे

खुशाली ते मला पुसती घरे शाबूत असणारे॥

पिठावर ओढती रेघा , करि सामर्थ्य नसणारे ॥

 

पहा इथे सारे ऋतु आले , कळ्यांना फार छळणारे॥

तमाशा पाहती सारे, तमाशा खुद्द होणारे ॥

शशीकला.