कसे हे जीव घेणारे, जिवाला जीव देणारे |
घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥
दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।।
दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।।
प्रतीक्षा संपली माझी आता कोणी न येणारे |
कुठे गेले सखे पक्षी , घरी दररोज येणारे ॥
कुणाला दाद मागावी, इथे सारेच जळणारे|
मनाला लाख सांगितले, कुणी नाही मनवणारे॥
हसु ते आणती ओठी , मनी आसू लपवणारे॥
कुणाला ही कसे सांगु, उरीचे दुख सलणारे
खुशाली ते मला पुसती घरे शाबूत असणारे॥
पिठावर ओढती रेघा , करि सामर्थ्य नसणारे ॥
पहा इथे सारे ऋतु आले , कळ्यांना फार छळणारे॥
तमाशा पाहती सारे, तमाशा खुद्द होणारे ॥
शशीकला.