Original Gazal

अबोल दोघे

Published on April 15, 2026

पहाटवारा बागेमध्ये कळ्याफुलांशी खेळत होता ।

कुणी बिचारा त्या समयाला अखेरचे क्षण मोजत होता

तुझ्या नी माझ्या भेटीमधल्या गोष्टी मज ना आठविती ।

मला स्मरे इतकेच निळा घन रिमझिम रिमझिम बरसत होता ॥

अबोल अस्फुट मुग्ध अशी ती कळी न फुलली वेलीवरती

तिला न कळले वसंत दुरुनी तिला कधीचा खुणवत होता

तुला ‘शशी’ ना कळले त्याच्या मनातले ते भाव कधीही

जयावरी तू प्रीती केली, प्रिया तुला तो मानत होता

अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून

टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत  होता ॥

शशिकला.