अबोल दोघे

अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।

टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत  होता ॥

शपथा

नशीबी जे असे माझ्या कुणाला ना कधी लाभो…  सुखाच्या ऐन समयाला सुखाचे टोचणे , खुपणे

कधी ज्या घेतल्या शपथा तयांना अर्थ ना उरला…  अता कोणास सांगावे व्यथांचे सोसणे , कुढणे 

Published
Categorized as Couplets

ओळख

ती सर्व दार बंद असतात ,

त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,

ते झरोके मालवलेले असतात ,

प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,

दिवाणी

परक्या घरात नाही जाणार तू कधीही

सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥

गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची

ओसाड उंबऱ्यांची,  शापित ती घराणी ॥ 

प्रतीक्षा

कसे हे जीव घेणारे,  जिवाला जीव देणारे | घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥ दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।। दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।।   प्रतीक्षा संपली माझी आता कोणी न येणारे | कुठे गेले सखे पक्षी , घरी दररोज येणारे ॥ कुणाला दाद मागावी, इथे सारेच जळणारे| मनाला लाख… Continue reading प्रतीक्षा

मृद्‌गंध

देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले

एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥

आसूसल्या मनाला समजावया हवे ना 

साऱ्याच जीवनाची स्वप्ने अतीत झाली ॥

रानभरी

नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी 

या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥

स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध 

दूर दूर क्षितिजावर अवतरेल स्वप्नपरी ॥ 

अवेळी

सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी 

काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥ 

गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी 

हीच प्रीतीरीत,  या समजावुनी तिला कुणी ॥

आस  

बोल नयनांचे कसे तुज उलगडावे, जागुनिया रातभर मी तळमळावे ॥ वाट आपण निवडलेली चालताना, टोचता काटे कशाला हळह‌ळावे ॥ दूर झाले जीवनातून मी तुझ्या रे, माझिया दारात तू ना घुटमळावे ॥ दुःख कायमचेच माझ्या सोबतीला, एकदा तरी जीवनी सुख डोकवावे ॥ जीव तोडून प्रीत केली ज्या घनांवर, तेच घन का वर्षता घर कोसळावे ॥ सायलीच्या… Continue reading आस  

निःसंग

मैफलीचा रंग हो तू, काळजात तरंग हो तू ॥ पौर्णिमेच्या चांदराती, मदनरूप अनंग हो तू ॥ घे पिऊनी आज मदिरा, मग उद्या निःसंग हो तू ॥ नाव घेऊन भर समुद्री, उसळता सारंग हो तू ॥ पांचजन्या फुंकणारा, आजचा रणरंग हो तू ।। रंग टाकुन पश्चिमेचे, येथला  सत्संग हो तू । न्यायधर्मा रक्षणारा, कालकूट भुजंग हो… Continue reading निःसंग