धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला
सांगितलं कितीदा नको रे नाचू…
प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं
जिवावर पडतं अन् लागतं बोचू …
Passionately explaining the beauty and depth of Urdu Ghazals
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला
सांगितलं कितीदा नको रे नाचू…
प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं
जिवावर पडतं अन् लागतं बोचू …
ती सर्व दार बंद असतात ,
त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,
ते झरोके मालवलेले असतात ,
प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,
परक्या घरात नाही जाणार तू कधीही
सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥
गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची
ओसाड उंबऱ्यांची, शापित ती घराणी ॥
नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी
या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥
स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध
दूर दूर क्षितिजावर अवतरेल स्वप्नपरी ॥
सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी
काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥
गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी
हीच प्रीतीरीत, या समजावुनी तिला कुणी ॥
बोल नयनांचे कसे तुज उलगडावे, जागुनिया रातभर मी तळमळावे ॥ वाट आपण निवडलेली चालताना, टोचता काटे कशाला हळहळावे ॥ दूर झाले जीवनातून मी तुझ्या रे, माझिया दारात तू ना घुटमळावे ॥ दुःख कायमचेच माझ्या सोबतीला, एकदा तरी जीवनी सुख डोकवावे ॥ जीव तोडून प्रीत केली ज्या घनांवर, तेच घन का वर्षता घर कोसळावे ॥ सायलीच्या… Continue reading आस
मैफलीचा रंग हो तू, काळजात तरंग हो तू ॥ पौर्णिमेच्या चांदराती, मदनरूप अनंग हो तू ॥ घे पिऊनी आज मदिरा, मग उद्या निःसंग हो तू ॥ नाव घेऊन भर समुद्री, उसळता सारंग हो तू ॥ पांचजन्या फुंकणारा, आजचा रणरंग हो तू ।। रंग टाकुन पश्चिमेचे, येथला सत्संग हो तू । न्यायधर्मा रक्षणारा, कालकूट भुजंग हो… Continue reading निःसंग
जीवनाशी पैज घ्याया लागला, श्वास आता अडखळाया लागला ॥ वाढला निवडुंग जेव्हा भोवती, मोगरा तेव्हा फुलाया लागला ॥ कोणती होती दिशा ती वेगळी, सूर्य जेथे ढासळाया लागला ॥ चालता वाटेवरी काट्यातुनी, कोण पंचम आळवाया लागला ॥ तो दिसे मुक्काम डोळ्यांच्या पुढे, प्राण अन् येथे ढळाया लागला ॥ काय सैताना तुझा हा न्याय रे, पुत्र आईला… Continue reading कोणती होती दिशा ती
पुसून टाका लडबडलेल्या त्या बेपरवा साऱ्या भिंती । नव्या युगाच्या आव्हानांनी फिरून सजवा या भिंती ॥ कळी अनाराची जर चिणली अन्यायाने आज इथे तर । करतिल धावुन एकजुटीने विरोध कडवा सा-या भिंती ॥ चला चला हो सर्व मिळुनिया कार्यारत व्हा एकमताने । अधल्यामधल्या दूरत्वाच्या खुशाल निजवा साऱ्या भिंती ॥ युग पुरुषाने अंदमानच्या काय पचवले धीटपणाने… Continue reading साऱ्या भिंती
चेहरा यातील ना येईल कामा, आरसा ? छे! हा फक्त पाऱ्याचा मुलामा ॥ काळ गेला हातचा केव्हा सुटोनी, शोक कसला आज करता हा रिकामा ॥ सवय काटेरी तृणांची पावलांना, आज रुततो पायी मखमाली रुजामा ॥ भटकले जगती अशी की मज अखेरी, वाट पुसते जायचे तुज कोण गामा ॥ ज्यावरी मी टाकिला विश्वास ते ही, करून… Continue reading स्वप्न घेऊन पापण्यांवर