भर उन्हाळी , पावसाळी गीत तू गाऊ नको पार क्षितिजा पोचल्यावर साद तू घालू नको ॥ जे कधी म्हटलेच नाही, तेही आहे जाणुनी बरसणारा मेघ ना , नुसताच तू गरजू नको ॥ शीड आहे फाटलेले, ना सुकाणू, ना दिशा भंगल्या नावेस नाविक आज तू होऊ नको ॥ आग शरीरी पेटली सात्त्विकतेची दहकती शिंपण्याला मृगजळाचे थेंब… Continue reading कवचकुंडल
Category: Original Poems
चार भिंती या जगाच्या सोबती
चार भिंती या जगाच्या सोबती, आसरा कोणास आता मागती । संपले तेव्हाच मी जेव्हा कधी, मित्र आले दुश्मनांच्या संगती ॥ टाकली तोडून आता पैंजणे, नादवलये ही कशाला भोवती । मी प्रकाशा या घरी बोलाविले आणि खिडक्या बंद साऱ्या तापती ॥ नाव सांगुन फूलपंखी कोण ते, रोज सुमनांच्या सुगंधा चोरती। रोप ज्यांनी एकही ना लाविले, हक्क… Continue reading चार भिंती या जगाच्या सोबती
ही कुठे नेणार मजला वाट आहे
भोवती काळोख आता दाट आहे ही कुठे नेणार मजला वाट आहे ॥ कारणे सांगू नको तू वंचनेची, जाणते मी, ही तुझी पळवाट आहे ॥ ना कुठेही मज किनारा साद घाली, मी अवेळी उसळलेली लाट आहे ॥ वाट बघुनी श्रांतले रे या ठिकाणी, सोबतीला एक पडका घाट आहे ॥ या उभ्या गावात फिरुनी पाहिले मी ना… Continue reading ही कुठे नेणार मजला वाट आहे
या जगाची रीत विपरित
या जगी खोटीच मूल्ये मज जपावी लागली, शेवटी माझीच गीते मज विकावी अगली ॥ जोजवीले या करांनी, ललन केले मी जीचे , ती कळी माझ्याच हाती मज खुडावी लागली ॥ यातनांची पालखी जी तुडविली पायातळी, नाईलाजाने पुन्हां ती मज पुजावी लागली ॥ पारध्याची पाहुनी ती अदयता त्या ऋत्विजा, पुण्यवाणी अनवधानी श्रापवावी लागली ॥ या… Continue reading या जगाची रीत विपरित
काही फुले सुगंधी…
काही फुले सुगंधी, काही कळ्या विषारी बागेत या जगाच्या नाना परी कटारी ॥ केल्या चुका हजारो, नाही क्षिति परंतू शिक्षा मला मिळाली प्रीतीतल्या जुगारी ॥ हे झाड बाभळीचे मी लाविले उरी या काट्यात साठलेला ज्याच्या मधू विषारी ॥ बेहोष त्या क्षणाला सर्वस्व अर्पिले मी सारी जगें मिळाली होऊनिया भिकारी ॥ झेलून वादळे ती सिंधूस जिंकिले… Continue reading काही फुले सुगंधी…
काही फुले सुगंधी…
काही फुले सुगंधी, काही काळ्या विषारी बागेत या जगाच्या, नाना परी कटारी