अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।
टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत होता ॥
Passionately explaining the beauty and depth of Urdu Ghazals
अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।
टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत होता ॥
कसे हे जीव घेणारे, जिवाला जीव देणारे | घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥ दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।। दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।। प्रतीक्षा संपली माझी आता कोणी न येणारे | कुठे गेले सखे पक्षी , घरी दररोज येणारे ॥ कुणाला दाद मागावी, इथे सारेच जळणारे| मनाला लाख… Continue reading प्रतीक्षा
देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले
एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥
आसूसल्या मनाला समजावया हवे ना
साऱ्याच जीवनाची स्वप्ने अतीत झाली ॥