धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला
सांगितलं कितीदा नको रे नाचू…
प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं
जिवावर पडतं अन् लागतं बोचू …
Passionately explaining the beauty and depth of Urdu Ghazals
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला
सांगितलं कितीदा नको रे नाचू…
प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं
जिवावर पडतं अन् लागतं बोचू …
अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।
टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत होता ॥
नशीबी जे असे माझ्या कुणाला ना कधी लाभो… सुखाच्या ऐन समयाला सुखाचे टोचणे , खुपणे
कधी ज्या घेतल्या शपथा तयांना अर्थ ना उरला… अता कोणास सांगावे व्यथांचे सोसणे , कुढणे
ती सर्व दार बंद असतात ,
त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,
ते झरोके मालवलेले असतात ,
प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,
परक्या घरात नाही जाणार तू कधीही
सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥
गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची
ओसाड उंबऱ्यांची, शापित ती घराणी ॥
कसे हे जीव घेणारे, जिवाला जीव देणारे | घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥ दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।। दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।। प्रतीक्षा संपली माझी आता कोणी न येणारे | कुठे गेले सखे पक्षी , घरी दररोज येणारे ॥ कुणाला दाद मागावी, इथे सारेच जळणारे| मनाला लाख… Continue reading प्रतीक्षा
देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले
एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥
आसूसल्या मनाला समजावया हवे ना
साऱ्याच जीवनाची स्वप्ने अतीत झाली ॥
नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी
या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥
स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध
दूर दूर क्षितिजावर अवतरेल स्वप्नपरी ॥
सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी
काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥
गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी
हीच प्रीतीरीत, या समजावुनी तिला कुणी ॥
बोल नयनांचे कसे तुज उलगडावे, जागुनिया रातभर मी तळमळावे ॥ वाट आपण निवडलेली चालताना, टोचता काटे कशाला हळहळावे ॥ दूर झाले जीवनातून मी तुझ्या रे, माझिया दारात तू ना घुटमळावे ॥ दुःख कायमचेच माझ्या सोबतीला, एकदा तरी जीवनी सुख डोकवावे ॥ जीव तोडून प्रीत केली ज्या घनांवर, तेच घन का वर्षता घर कोसळावे ॥ सायलीच्या… Continue reading आस