एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
परक्या घरात नाही जाणार तू कधीही
सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥
गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची
ओसाड उंबऱ्यांची, शापित ती घराणी ॥
जेथे तुझी नि माझी साकारतील स्वप्ने
सारीच जगरहाटी थांबेल त्या ठिकाणी ॥
शपथा कशास घालू मार्गामधे तुझ्या मी
जाई सुखे परन्तू, देऊन जा निशाणी ॥
सांगीतली न कोणा मी आपुली कहाणी
फैलावली कशीही साऱ्या जगी विराणी ॥
प्रीतीत कृष्णजीच्या उधळून जीवनाला
मीरा अखेर ठरली साऱ्या जगी दिवाणी ॥
शशीकला.