धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला
सांगितलं कितीदा नको रे नाचू…
प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं
जिवावर पडतं अन् लागतं बोचू …
घनगंभीर मेघांना, खळाळत्या ओघांना
विनवलं अनेकदा वेग करा कमी…
पहाताना पाऊस हा थरारे जीव माझा
सजण दूर गेला एकली इथे मी…
कुहूक टाहो ग नकोस फोडू गं
सलतो उरी गं कंठीचा पंचम…
अशा या अवेळी, कातर सायंकाळी
शिणवू नको गळी तरल सरगम…
शशीकला.