एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
पुनवेची रात सख्या, जाऊ चल नदीवरी
बोलू जवळ बसुनी जे बोललो न आजवरी ॥
लोचनात प्रतिबिंबित, पूर्णबिंब चन्द्रमा
रूप एकमेकांचे न्याहळू जळावरी ॥
नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी
या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥
स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध
दूर दूर क्षितिजावर अवतरेल स्वप्नपरी ॥
शशीकला.