एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
पुसून टाका लडबडलेल्या त्या बेपरवा साऱ्या भिंती ।
नव्या युगाच्या आव्हानांनी फिरून सजवा या भिंती ॥
कळी अनाराची जर चिणली अन्यायाने आज इथे तर ।
करतिल धावुन एकजुटीने विरोध कडवा सा-या भिंती ॥
चला चला हो सर्व मिळुनिया कार्यारत व्हा एकमताने ।
अधल्यामधल्या दूरत्वाच्या खुशाल निजवा साऱ्या भिंती ॥
युग पुरुषाने अंदमानच्या काय पचवले धीटपणाने ।
किती सोसले मूकपणाने करती गवगवा साऱ्या भिंती ॥
जरा जपूनी बोला तुम्ही, सावधतेने चाला तुम्ही।
सभोवताली उभ्या पांघरून रंग भगवा साऱ्या भिंती ॥
शशीकला.