Original Poems

स्वप्न घेऊन पापण्यांवर

Published on April 15, 2026

चेहरा यातील ना येईल कामा, आरसा ? छे! हा फक्त पाऱ्याचा मुलामा ॥

काळ गेला हातचा केव्हा सुटोनी, शोक कसला आज करता हा रिकामा ॥

सवय काटेरी तृणांची पावलांना, आज रुततो पायी मख‌माली रुजामा ॥

भटकले जगती अशी की मज अखेरी, वाट पुसते जायचे तुज कोण गामा ॥ 

ज्यावरी मी टाकिला विश्वास ते ही, करून गेले यातनांचा पंचनामा ॥

स्वप्न घेऊन पापण्यांवर मीलनाचे, वेदना सोशीत जळते एक शामा ॥

शशिकला.