एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी
काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥
गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी
हीच प्रीतीरीत, या समजावुनी तिला कुणी ॥
साजणाला विनवले दया न येई त्याजला
साद घालित या इथे उभी शकुंतला कुणी ॥
चेहऱ्याच्या भोवती भिरभिरे पतंग हा
दृष्ट काढी जणू, घेऊनी अलाबला कुणी ॥
नीर नयनी दाटले, कपोल ओलसर जरा
या अवेळी चुकुन, मेघ राग छेडीला कुणी ॥
शशीकला.