Original Poems

दिवाणी

Published on April 15, 2026

परक्या घरात नाही जाणार तू कधीही

सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥

गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची

ओसाड उंबऱ्यांची,  शापित ती घराणी ॥ 

 

जेथे तुझी नि माझी साकारतील स्वप्ने

सारीच जगरहाटी थांबेल त्या ठिकाणी ॥

शपथा कशास घालू मार्गामधे तुझ्या मी

जाई सुखे परन्तू, देऊन जा निशाणी ॥

 

सांगीतली न कोणा मी आपुली कहाणी

फैलावली कशीही साऱ्या जगी विराणी ॥

प्रीतीत  कृष्णजीच्या उधळून जीवनाला

मीरा अखेर ठरली साऱ्या जगी दिवाणी  ॥

शशीकला.